Categories: बातम्या हवामान

राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, पहा २३ ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज एका क्लिकवर

मुंबई | गेल्या ४ दिवसांत राज्यात धुमाकुळ घातलेल्या पावसाने शेतीसह अनेक मोठी जिवीतहानी देखील केली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने करोडो रूपयांचे नुकसान झाले असून अद्यापही हा धोका टळलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे चक्रीवादळ निर्माण झाले होते. याचा फटका महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा या राज्यांना बसला आहे. (IMD WEATHER)

कमी दाबाचा पट्टा उद्या (१९ ऑक्टोबर) पुन्हा तयार होण्याची शक्यता असून यामुळे पुढील काही दिवस राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (१८ ऑक्टोबर) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या (१९ ऑक्टोबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही परिस्थिती २३ ऑक्टोबर पर्यंत राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज सविस्तरपणे पाहण्यासाठी IMD WEATHER या ठिकाणी क्लिक करा.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Allmatti dam august weather forecast heavy rain in October 2020 July weather forecast live cyclone live hurricane monsoon 2020 monsoon climate monsoon weather monsoons in india northeast monsoon nutritious kharif October 2020 live hurricane signs of good rains southwest-monsoon summer monsoon types of monsoon Weather forecast आजचे हवामान अंदाज 2020 live हवामान अंदाज 2020 हवामान अंदाज पुणे हवामान अंदाज मराठवाडा हवामान अंदाज महाराष्ट्र 2019 हवामान अंदाज महाराष्ट्र 2020