मुंबई। येत्या चोवीस तासात महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागात चक्रीवादळाच्या आक्रमकतेमुळे तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती ओढवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. केरळ, तटीय कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्येही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पूर्वोत्तर भारताच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिमी हिमालय, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम, तेलंगाना आणि तटीय आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राजधानी दिल्ली आणि एनसीआर मध्ये देखील हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे मुसळधार पावसासह चक्री वादळाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. हे चक्रीवादळ प्रामुख्याने किनारपट्टीलगतच्या भागात अतिशय प्रभावी असणार आहे, त्यामुळे मच्छीमार आणि किनारपट्टीलगतच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आज पहाटे ५:३० वाजता हे चक्रीवादळ गोवा-पणजीपासून पश्चिमेकडे २८० किमी दूर तर मुंबईच्या दक्षिण-पश्चिमेपासून ४८० किलोमीटर दूर होते. राजस्थानच्या पश्चिमी भागांवर चक्रवाती हवामानाचे क्षेत्र आधीपासूनच आहे.
एक ट्रफ रेषा पूर्व उत्तर प्रदेश पासून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पासून ओडिशाच्या दक्षिण सागरी किनारपट्टीपर्यंत तयार झाली आहे. गेल्या २४ तासात दक्षिण कर्नाटक किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आंतरिक तामिळनाडु, रायलसीमा आणि उत्तर-पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्येही पाऊस पडला आहे. लक्षद्वीप, अंदमान व निकोबार द्वीपसमूह, उर्वरित कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तरी ओडिशाच्या काही भागांमध्ये मध्यम तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पश्चिमी हिमालय, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमी मध्य प्रदेश, पश्चिम व पूर्वेकडील राजस्थान, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोंकण-गोवा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टीलगतच्या काही भागात हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
News Source : Skymate Weather