Categories: हवामान

हवामान अंदाज ५ सप्टेंबर: मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

देशाच्या मध्य भागांत, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशवर आहे. मान्सूनची ट्रफ रेषा मध्य प्रदेश, छत्तीसगडला ओलांडून बंगालच्या खाडीपर्येंत विस्तारलेली आहे ज्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण झारखंड, उत्तर महाराष्ट्रातील बर्‍याच भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस संभव आहे. देशाच्या मध्य भागातील उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.

दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत मान्सूनची सक्रिय ट्रफ विस्तारलेली आहे ज्यामुळे महाराष्ट्र किनारपट्टीवर तुलनेने कमी तीव्रतेसह मुसळधार पाऊस पडेल. मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता कमी होईल परंतु मुसळधार पाऊस सुरु राहील. किनार्यावरील कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. उत्तर तेलंगणा आणि उत्तर आंध्र प्रदेश, अत्यधिक उत्तर कर्नाटक आणि दक्षिण केरळमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहावर जोरदार वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील .

देशाच्या पूर्वेकडील भागात, कमी दाबाच्या क्षेत्राच्या पुढील हालचालींमुळे पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये पावसाच्या हालचाली कमी झाल्या आहेत. मुख्यतः काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशावर मध्यम सरींची शक्यता आहे.

पूर्व आसाममध्ये एक चक्रवाती परिस्थिती आहे ज्यामुळे पूर्वोत्तर राज्य, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किम आणि लगतच्या ईशान्य बिहारच्या बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. उत्तराखंडमध्ये मुसळधार सरींची शक्यता आहे.जम्मू-काश्मीरमध्ये कोरडे हवामान असेल. अशीच हवामान स्थिती पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, अति पश्चिम उत्तर प्रदेशात दिसेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: maharashtra monsoon monsoon in mumbai mumbai monsoon mumbai rains mumbai rains 2019 mumbai rains live mumbai rains news mumbai rains update mumbai weather rain in mumbai skymate weather2019 weather in mumbai