कोरोनाच्या उपचारासाठी ४००० रूपये देणारी प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना नक्की काय आहे?

नवी दिल्ली : प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने अंतर्गत कोरोना व्हायरसच्या इलाजासाठी देशातील तरुणांना ४००० रूपयांची मदत केली जात आहे. यासाठी सध्या रजिस्ट्रेशन चालू असून तुम्ही ही रजिस्ट्रेशन करा असा संदेश सध्या देशभरातील नागरिकांच्या व्हाटस अप, टेलिग्राम सारख्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेसंदर्भात व्हायरल होणारा हा संदेश आम्हालाही अनेक लोंकाकडून मिळत होता. त्यामुळे हा व्हायरल मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही थेट सरकारच्या PIB Fact Chek या अधिकृत ट्विटर हॅंडलवर जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आत्तापर्यंत किती जणांना या योजनेचा लाभ झाला याची पोलखोल झाली.

PIB ने १८ ऑगस्ट २०२१ रोजीच ह्या बद्दल पोस्ट करून व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आलेला दावा खोटा असून केंद्र सरकारच्या वतीने अशी कोणतीही योजना कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हायरल होणारा संदेश खोटा असून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याच्या हेतूने पाठवला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तुम्ही देखील असे संदेश फॉरवर्ड करताना खात्री करा आणि मगच निर्णय घ्या.

कसा ओळखणार फेक मेसेज
१) सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजना त्या त्या खात्याच्या अधिकृत वेबसाईट वर पहायला मिळतात.
२) कोणत्याही सरकारी योजनेच्या वेबसाईट चे डोमेन नेम .gov.in असे असते.