मुंबई | दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे वाढते दर सर्वसामन्यांच्या खिशाला परवडेनासे झाले आहेत. त्यात भविष्यातील पेट्रोल-डिझेलची उपलब्धला आणि प्रदूषण या सर्वांचा विचार करुन नवीन पर्यांयांचा विचार केला जात आहे. म्हणूनच जीवाश्म इंधनाच्या पर्यायात (Fossil Fuels) काही प्रयोग केले जात आहेत. ज्यात नवीन इंधन (Ethanol) सध्याच्या वाहनांमध्ये वापरता येईल. अलीकडेच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही लवकरच देशात इथेनॉलयुक्त इंधन असलेली वाहने धावण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत इथेनॉल पेट्रोल म्हणजे काय आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? (Pros and Cons of Ethanol Petrol) हे समजून घेणे आवश्यक आहे.

इथेनॉल म्हणजे काय? (What is Ethanol?)
इथेनॉल (Ethanol) हे एक सेंद्रिय संयुग (organic compound) आहे, इथाइल अल्कोहोल, जे बायोमासपासून बनवलेले इंधन आहे. अल्कोहोलसारख्या अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये याचा वापर केला जातो. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ऑक्टेन मात्रा गॅसोलीनपेक्षा जास्त आहे, म्हणजेच पारंपरिक पेट्रोलहून जास्त, ज्यामुळे ते पेट्रोलपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. वाहनांच्या इंधनासाठी इथेनॉल पूर्णपणे वापरता येत असले, तरी त्यासाठी वाहनांच्या इंजिनात काही बदल करावे लागतील. मात्र सध्याच्या पेट्रोलमध्येच ते मिसळून त्याचा प्रभावी वापर करता येतो. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी त्याचा वापरही सुरू झाला आहे.

इथेनॉलच्या वापराने गाडीवर परिणाम होतो का?
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने सध्याच्या वाहनावर कोणताही परिणाम होत नाही, असे सांगण्यात येते. इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असल्याने, ते इंधनाचे अधिक ज्वलन करण्यास मदत करते, उत्सर्जन कमी करते आणि पर्यावरणासाठी ते अधिक चांगले इंधन बनवते.

सध्याच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल किती आहे?
सध्या देशात अनेक ठिकाणी पेट्रोलमध्ये 5 ते 10 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. एक-दोन टक्क्यांपासून सुरुवात झाली, पण आता ते दहा टक्क्यांपर्यंत वाढवलं जात आहे. इथेनॉलची किंमत सुमारे 61 रुपये प्रति लिटर आहे. सध्या महागड्या पेट्रोलमध्ये ते मिसळल्यास तुमचा खर्च कमी होऊ शकतो.

इथेनॉलयुक्त पेट्रोलची किंमत
इथेनॉल असलेल्या पेट्रोलची किंमत पेट्रोल आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यासाठी पेट्रोल पंपावर स्वतंत्र व्यवस्था ठेवावी लागेल. त्याची डिलिव्हरी मशीनही वेगळी आहे. यामुळे पेट्रोल पंप मालकांवर अतिरिक्त भार पडू शकतो, परंतु हा अतिरेक किंवा अनियंत्रित खर्च नाही. त्यावर योग्य नियोजन करून नियंत्रणही ठेवता येते. सध्या त्याची किंमत पेट्रोलच्या किमतीएवढीच ठेवण्यात आली आहे.

इथेनॉल असलेल्या पेट्रोलमध्ये फारच कमी प्रमाणात पाणी असते. पण ते हानिकारक ठरत नाही. सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये, जेव्हा पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जाते तेव्हा ते इंजिन आणि त्याच्या इतर भागांसाठी हानिकारक मानले जाते. पण इथेनॉल असलेल्या पेट्रोलमध्ये फारच कमी पाणी असते. इथेनॉल असलेल्या पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले जातात.

पेट्रोलियम डीलर्सना नियमित गुणवत्ता तपासणी करण्यास सांगितले जाते आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. इथेनॉल पेट्रोलपासून वेगळे करता येत नाही. यामध्ये, तेच मानक वापरले जातात जे जगातील इतर देशांमध्ये होत आहेत. सध्या पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा विचार करता येत नाही, त्यासाठी अनेक बदल करावे लागतील आणि त्यासाठी अनेक व्यावहारिक आव्हानांनाही तोंड द्यावे लागणार आहे.