कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “कोल्हापूर कलेक्टरकडून सूचना” अशा मथळ्याखालील व्हाटस अॅपवर फिरत असलेल्या संदेशाची सत्यता वेगळीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने खुलासा केला असून हा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा संदेशावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
तसेच अधिकृत माहिती, छायाचित्रे आणि चित्रफितींसाठी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूरच्या अधिकृत लिंकवर संपर्क करण्याचेही आवाहन केले आहे.
https://www.blogger.com/blogger.g?tab=mj&blogID=9063164142862350912#allposts
https://www.facebook.com/diokolhapur/
https://twitter.com/Info_Kolhapur
https://www.youtube.com/channel/UCjI9NmOPglMcQD3rGDbAOOg
हा संदेश होत आहे व्हायरल –
कोल्हापूर कलेक्टर कडून सूचना
लवकरच कोरोना 3rd स्टेज ला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना *शेजारि पाजारि बंद *कोनासोबत फ़िरने बंद *गरम पानी सर्व गरज साठि वापरने *ब्रेड पाव बेकरी सामान बंद *बाहेरील व्यक्ती घरा मधे कोनत्याहि कामासाटि घेवु नये.
आजुन सविस्तर -….