Categories: Featured आरोग्य

काय..! वजन कमी करण्यासाठी बटाटा?

होय.. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असणारा बटाटा ‘जादुई खाद्य’ आहे असं म्हटल्यास नवल वाटायला नको. बटाटा म्हणजे पोषक तत्वांची खाणच..! पण बऱ्याच लोकांना हा गुणकारी बटाटा शरीरावरील चरबी म्हणजेच फॅट्स वाढविणारा घटकच वाटतो. मात्र एका रिसर्चनुसार बटाट्याचे नियमीत सेवन केल्यास लठ्ठपणाचा त्रास दूर होतो हे निदर्शनास आले आहे.

‘जर्नल मॉलिक्युलर ऑफ न्यूट्रिशन अ‍ॅन्ड फूड’ च्या रिसर्चनुसार, जर नियमित बटाट्याचे सेवन केले तर वजन कमी होते. दररोज सलग ५ दिवस केवळ बटाटे खाल्यास, तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. बटाटे खाल्ल्यानंतर सतत भूक लागत नाही. तसेच पोट भरले असल्याने अतिखाण्याचा प्रश्न येत नाही. कारण बटाटा हा एक पिष्टमय पदार्थ आहे, ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त व कॅलरी कमी असतात. यामुळे मेटाबॉलिजम वाढते व वजन नियंत्रित राहते. त्याचबरोबर अंडरवेट लोकांसाठी ही बटाटा उपयुक्त आहे. अशा लोकांनी नियमित आपल्या आहारात बटाट्याचा समावेश केल्याने शरीराला पोषक तत्वांची पूर्तता होऊन शरीरावर चरबी वाढेल.

एका मध्यम आकाराच्या बटाट्यात १६८ कॅलरी असतात. उकडलेल्या बटाट्यात केवळ १०० कॅलरी असतात. बटाटा हा व्हिटॅमिन बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फोरससारख्या पोषकतत्वांचा रिच सोर्स आहे. उकडलेले दोन-तीन बटाटे सालीसह दह्यासोबत खाल्ल्यास एक संपूर्ण आहार होतो. पोषक तत्वांमुळे बटाटा केस आणि त्वचेचं सौंदर्य वाढवण्यास मदत करतो. बटाट्यामध्ये त्वचेचा रंग उजळ करणारे नॅचरल ब्लीचिंग एजंट्स आहेत. तसेच सुरकुत्या पडत नाही असे जीवनसत्व क, तांबे आणि जस्त या घटकांचा समावेश होतो.

Team Lokshahi News