Categories: अर्थ/उद्योग तंत्रज्ञान बातम्या

Whats app Pay : जाणून घ्या कशी करायची पैशांची देवाणघेवाण

नवी दिल्ली | व्हाटस् अप ने भारतीयांसाठी एक खास फिचर उपलब्ध करून दिले असून चॅटिंग करता करता पैशांची देवाण घेवाण करता येणार आहे. ही UPI- आधारित व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्विस आहे. याची भारतात फेब्रुवारीपासून टेस्टिंग केली जात होती. आता ही सेवा सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 

याद्वारे युजर्सला आपल्या यूपीआय इनेबल बँक अकाउंट्सला लिंक करता येते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवता येवू शकतात. व्हॉट्सअॅप पे सर्व प्रसिद्ध बँक्स एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि एअरटेल पेमेंटला सपोर्ट करत असून यामुळे लोकांना पेमेंटसाठी वेगळ्या अॅपच्या इन्स्टॉलेशनची गरज भासणार नाही.

व्हॉटस् अप पे साठी सर्वात आधी व्हॉट्सअॅप अपडेट करा. अपडेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा. उजव्या बाजूला दिलेल्या मेन्यूत तीन डॉट आयकॉनवर टॅप करा. या ठिकाणी Payment चे नवीन ऑप्शन दिसेल. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला Add Payment Method वर टॅप करावे लागेल. आता Accept and Continue वर टॅप करा. याठिकाणी तुम्हाला बँकेची एक यादी मिळेल. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमचा नंबर (बँक खात्याशी लिंक) व्हेरिफाय केला जाईल. व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक एसएमएस येईल. त्यामुळे व्हॉट्सअॅप नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक यूपीआय पिन सेट करावा लागेल. त्याचा वापर पेमेंट करताना केला जाईल. 

  • सर्वप्रथम व्हाट्सअप ओपन करून सेटिंगमध्ये जाऊन पेमेंट्सवर क्लिक करावे.
  • नंतर न्यू पेमेंट्स आणि सेंड टू यूपीआय आयडी टॅप करावे. त्यानंतर यूपीआय आयडी टाकून व्हेरिफाय करावे.
  • यूपीआय आयडी व्हेरिफाय झाल्यानंतर अमाऊंट टाकून इंटर करावे.
  • पेमेंट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी यूपीआय पिन टाकावा.
  • Open a WhatsApp chat and tap the attachment icon. Tap Payment > type the desired amount > hit enter. Enter your UPI pin to complete the payment.
Team Lokshahi News