नवी दिल्ली | पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने निधी खर्च करत आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये थेट हस्तांतर करणारी ही योजना यामुळेच देशभरातील शेतकरी वर्गात लोकप्रिय झाली आहे. बऱ्याचदा सरकारी योजना म्हणटलं की त्यांच्या लाभार्थ्यांकडून योजनेचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार होतात. पीएम किसान योजनेच्या बाबतीत देखील हा प्रश्न समोर येत होता. शेतकरी या पैशाचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी करतो हे समजत नव्हते. त्यामुळे हा प्रश्नाचे उत्तर इंडियन काउंसिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च आणि इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टियुट यांनी एका सर्वेच्या माध्यमातून दिले आहे.
या संस्थेने केलेल्या सर्व्हेत याविषयीचा खुलासा झाला पीएम किसान योजनेतील पैसा शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळणारा निधी कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात हे स्पष्ट झाले आहे. संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कृषी विज्ञान केंद्रानी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आपला पैसा अवजारे, बी-बियाणे आणि खतांवर खर्च करत असल्याचे दिसून आले. अभ्यासानुसार, पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता ५२ टक्के शेतकऱ्यांनी शेतीशी संबंधित कामांसाठी खर्च केला होता. या योजनेचा लाभ घेणाऱ्या २६ टक्के शेतकऱ्यांनी मिळणाऱ्या निधीतील ७ टक्के उपभोग्य वस्तूंवर खर्च केल्याचे दिसून आले. शिक्षण आणि आरोग्यावरदेखील ७ टक्के शेतकऱ्यांनी खर्च केला, तर १५ टक्के शेतकऱ्यांनी सण आणि लग्न समारंभासाठी हा पैसा खर्च केल्याचे स्पष्ट झाले. शेती कामांचा हंगाम नसताना ६० टक्के शेतकऱ्यांनी पीएम किसान सम्मान योजनेचा पैसा शिक्षण, आरोग्य आणि उपभोग्य वस्तूंवर खर्च केला, परंतु जेव्हा शेतीकामांचा हंगाम सुरू झाला तेव्हा शेतीकामासाठीच हा पैसा शेतकऱ्यांनी खर्च केल्याचेही दिसून आले.
सरकारने आधी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आखली होती परंतु आता हा नियम रद्द करण्यात आला असून जमीनीच्या कमाल धारणेची अट काढून टाकण्यात आली आहे. सध्या या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून येत्या १ ऑगस्ट पासून त्याचे वितरण होणार असल्याची माहिती यापूर्वीच सरकारकडून देण्यात आली आहे.
News Source – Krishijagaran