Categories: Featured

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) कोरोनासंदर्भात मोठी घोषणा

जिनीवाजागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात ४३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल असं WHO ने म्हणटलं आहे. (WHO Declare Corona As Pandemic) 

कोरोना विषाणूला Pandemic घोषित करण्याच्या संबंधी WHO चे प्रमुख टेड्रोस अदनोम यांनी पत्रकारांना सांगितलं, “WHO या प्राणघातक विषाणूच्या प्रादुर्भावाचे मूल्यांकन करत आहे. आम्ही त्याच्या धोकादायक प्रमाणात प्रसार आणि निष्क्रियतेचा घातक स्तर या दोन्हीबाबत चिंतीत आहोत. आमच्या मूल्यांकनानुसार, #COVID१९ ला जगभरात परसलेला साथीचा आजार (Pandemic) म्हणून ओळखलं जाईल. आमचं काम लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आहे. कोरोना विषाणूच्या आर्थिक आणि सामाजिक प्रभावाला कमी करण्यासाठी आम्ही अनेकांसोबत मिळून काम करत आहोत.”

Pandemic म्हणजेकाय?

Pandemic घोषित करण्यासाठी संबंधित आजार संसर्गजन्य असणे आवश्यक आहे. कर्करोगाची व्याप्ती जगभरात आहे, परंतु हा साथीचा आजार नसल्यामुळे त्याला ‘पॅनडेमिक’ असे संबोधता येत नाही. सध्याच्या घडीला एचआयव्ही/एड्स आणि कोरोना व्हायरस (कोविड 19) हे दोन ‘पॅनडेमिक’ घोषित करण्यात आले आहेत. कांजिण्य, टीबी, एच1एन1, स्पॅनिश फ्ल्यू, मलेरिया, इबोला, झिका यासारख्या आजारांना आतापर्यंत ‘पॅनडेमिक’ ही संज्ञा वापरण्यात आली होती. ‘प्लेग’ हा मानवी इतिहासातील सर्वात भयंकर ‘पॅनडेमिक’ ठरला होता.

कोरोना व्हायरस (Coronavirus Disease २०१९ COVID-१९) 

जानेवारी २०२० मध्ये चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा उगम झाला. कोरोना व्हायरसमुळे ‘तीव्र श्वसन रोग’ होतो. आतापर्यंत १०० देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याची नोंद आहे. मध्य चीन, इटली, दक्षिण कोरिया आणि इटली या देशांना याचा मोठा फटका बसला आहे.

जगभरात कोरोनाची दहशत

जगभरात कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये जन्मलेला कोरोना विषाणू सध्या जगाच्या प्रत्येक बेटावर पोहोचला आहे. यातून भारतही सुटू शकलेला नाही. आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत कोरोनाचे ६०  संशयित समोर आले आहेत.

इटलीमध्ये कोरोनाचा हाहा:कार

कोरोना विषाणूचा सर्वात मोठा धोका हा इटलीला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास १०,१४९ लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. तर तब्बल ६३० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा मृत्युदर इतर देशांच्या तुलनेत येथे दुप्पट आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

इटलीने कोरोनाला रोखण्यासाठी शहराला लॉक डाऊन केलं. म्हणजेच इटलीच्या नागरिकांवर कुठेही ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर आखाती देशांनी परदेशी नागरिकांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घातला आहे. भारतातही १५ एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांच्या येण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

Team Lokshahi News