पीकांचे खत व्यवस्थापन करताना शेतकरी प्रामुख्याने नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्याच वापराकडे लक्ष देता. यामुळे पिकाला उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता भासते. अलीकडच्या काळातील विचार केल्यास जमिनीत गंधकाची कमतरता दिसून येत आहे. परंतु पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यासाठी गंधक महत्त्वाचे असल्याने त्याची कमतरता जाणवत असल्यास ती भरून काढण्यासाठी उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे.
गंधक म्हणजेच सल्फर. बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा अधिक वापर केला जातो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध असून यामध्ये गंधकाचे प्रमाण दहा टक्के आहे. तर शंभर टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये मिळते.
गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होत असल्याने पीकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत चांगली वाढ होत असल्याचे दिसून येते. गंधकाला भूसुधारक असेही म्हणटले जाते. कारण गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि इतर खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनात चांगली वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादनही वाढण्यास मदत होते.
गंधकाचे पिकांमधील प्रमुख कार्य
जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणे –
गंधकाच्या कमतरतेमुळे पिक नुकसानीची लक्षणे –
गंधक व्यवस्थापनाचे फायदे
पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी समतोल खत व्यवस्थापन गरजेचे आहे. यासाठी शेतकरी बंधूनी माती परिक्षण करून जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता पडताळून पाहणे आवश्यक आहे. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत विविध पिकांसाठी २० ते ४० किलोग्रॅम गंधकाची मात्रा उपयुक्त ठरते. नत्र: स्फुरद: पालाश: गंधक यांचे गुणोत्तर ४:२:१:१ असे असणे गरजेचे आहे. गंधकयुक्त खतांचा वापर प्रामुख्याने पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीत पेरून केला जातो. जिप्सम आणि सिंगल सुपर फॉस्फेट ही सर्व साधारणपणे गंधकयुक्त खते म्हणून वापरली जातात. आर्यन पायराईट व गंधक भुकटी वापरायची असेल तर पिकांच्या पेरणीतून तीन ते चार आठवडे जमिनीत मिसळून द्यावे अशा प्रकारे गंधक या दुर्लक्षित खतांच्या वापरामुळे आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल.
अलिकडच्या शेती पद्धतीमधील जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाचा वाढता वापर, सेंद्रिय खतांचे अल्प प्रमाण आणि गंधकविरहित खतांचा सततचा वापर यामुळे गंधकाची कमतरता दिसून येते. गंधक हे नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या पाठोपाठ गरजेचे असणारे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून महत्त्वाचे ठरत आहे. डाय अमोनिअम फॉस्फेटसारख्या गंधकविरहित खताचा वाढता वापर हेसुद्धा जमिनीतील गंधकाच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्फुरदाचा पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट या सरळ खताचा वापर डाय अमोनिअम फॉस्फेटऐवजी केला जातो. त्यातील जवळ जवळ १२ टक्के गंधकाचा पुरवठा केला जाऊन जमिनीतील वाढती गंधकाची कमतरता कमी करता येते. एकीकडे एकत्रित नत्र व स्फुरदाच्या वापरासाठी आणि त्यामुळे होणाऱ्या मजुरीतील बचतीसाठी डाय अमोनिअम फॉस्फेटचा वापर केला जातो; परंतु त्यामुळे गंधकाची कमतरता वाढते, आणि पुन्हा गंधकावर होणारा खतांचा आणि मजुरीचा खर्च वाढतो. त्यासाठी स्फुरदाचा स्रोत म्हणून सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर वाढविणे गरजेचे आहे, जेणेकरून स्फुरद व गंधक दोन्हींचा वापर एकत्रित केला जाईल.
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे
गंधकामुळे तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण तसेच उत्पादनात वाढ होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जैविक नत्र स्थिर करण्यासाठी गंधकाची मदत होते. उदा. सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्यांच्या वजनात वाढ होते. गंधकामुळे कडधान्य पिकांची प्रतीमध्ये वाढ होते. उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते.