Categories: Featured सामाजिक

१ स्पटेंबर पासून एलपीजी स्वस्त होणार?

नवी दिल्ली | केंद्र सरकार १ सप्टेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे. या बदलात अनेक वस्तूंचा दर वाढणार किंवा घटणार आहे. एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाईन्स आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. 

यामध्ये सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असून, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. देशातील कोरोना संकटाच्या काळात महागाई वाढताना दिसत आहे. भाजीपाल्यांचे दर वाढत असल्याने महिलांचा बजेट कोलमडत आहे,  उद्यापासून घरगुती सिलिंडरचा दर कमी होण्याची शक्यता आहे, यामुळे गृहिणींचा बजेटमध्ये बचत होऊ शकते. 

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरची किंमत बदलते. अशा परिस्थितीत १ सप्टेंबरला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुधारणा  करु शकतात, असा विश्वास आहे.  दुसरीकडे उड्डाण प्रवास महागणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने १ सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवावाशांकडून  उच्च विमानन सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एएसएफ फी म्हणून आता स्थानिक प्रवाशांकडून १५० च्या ऐवजी १६० रुपये आकारले जातील, तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून ४.८५ डॉलरऐवजी ५.२ आकारले जातील.

यासह ईएमआयचा बोजा देखील वाढणार आहे. ईएम्आय परत फेड करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचणार आहे. कारण कोरोनाच्या संकटामुळे यंदा मार्चमध्ये बंदी घातलेल्या  कर्ज ग्राहकांच्या ईएमआयची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. स्टेट बँक इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक  पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेईल.  

Team Lokshahi News