कुकुटपालनामध्ये प्रत्येक ऋतुमानानुसार व्यवस्थापनामध्ये बदल करून कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते. सध्या थंडीचा कडाका वाढत असून उशिरा सुरू झालेल्या हिवाळ्यामुळे कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोंबड्यामध्ये प्रामुख्याने विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजिवजन्य, पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसीस व इतर विषबाधा आढळतात.यामुळे कोंबड्यांचे वजन घटणे, पक्षांचा आकस्मित मृत्यू होणे अशा समस्या उद्भवतात. बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये अतिथंडीमध्ये पक्षांवर अतिताण येतो. त्यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मांस व अंडी उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास हिवाळ्यातील कोंबडीव्यवस्थापन
हिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना
हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो. त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी आणि खाद्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे की तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे.
शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत.
दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
शेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा ब्रुडरच्या साहाय्याने वाढवावे.
लोडशेंडींगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी.
मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही.
पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
बऱ्याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार होता. त्यासाठी प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
कोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतुमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपुर्वक शेड तयार करावे. तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.
कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे.
ज्या ज्या वेळी हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येतो, त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ‘ब’ जीवनसत्वाचा वापर करावा, जेणेकरुन पक्षावरील ताण कमी होतो
आवश्यकता भासल्यास जवळच्या पशुवैद्यकांशी संपर्क साधावा.