Categories: अर्थ/उद्योग कृषी

पैसे नसतानाही शेतजमिन खरेदी करून व्हा शेतीचे मालक; जाणून घ्या ‘ही’ योजना

दिवसेंदिवस स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे प्रत्येकालाच फार महत्वाचे वाटू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरी व्यवसायावर पाणी सोडावे लागलेल्यांना तर ही बाब प्रकर्षाने जाणवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु असे असले तरी मुळातच ग्रामीण भागातील अनेक लोकांना स्वतःची शेतजमीन नाही किंवा असली तरी ती अगदी अल्प स्वरूपात आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असली तरी पैशाअभावी ती खरेदी करता येत नाही. लहान आणि सिमांत शेतकऱ्यांची हीच अडचण ध्यानात घेत स्टेट बॅंकेने एक अफलातून योजना आणली असून शेतकऱ्यांना पैसा नसताना देखील जमीन खरेदी करता येणार आहे. बॅंकेने शेतकऱ्यांसाठी ‘जमीन खरेदी योजना’ आणली आहे. (निळ्या अक्षरावर क्लिक करा आणि पोहचा थेट स्कीमच्या लिंकवर)

योजनेचा उद्देश –
एसबीआय (लँड परचेस स्कीम) जमीन खरेदी योजनेचा उद्देश हा आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेती करण्यायोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा आहे. या योजनेचा लाभ घेताना किंवा या योजनेतून कर्ज घेण्यासाठी एक अट आहे. अर्जदारावर कोणत्याही दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.

योजनेची वैशिष्टये –
खालील गोष्टींसाठी कर्ज दिले जाईल.
१ ) जमीन खरेदी
२) जमीन विकास, सिंचन विकास ( जमिनीच्या एकूण किमतीच्या ५०% पेक्षा जास्त नसावी)
३ ) शेती अवजारे खरेदी
४ ) जमीन नोंदणी फी
५ ) कर्जाच्या रकमेच्या ८५% पर्यंत कर्ज मिळेल.
६ ) गहाण असलेली जमीन घेण्यासाठी

पात्र शेतकरी :
१ ) लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती आणि २.५ एकरपेक्षा कमी सिंचित जमीन आहे.
२ ) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने मागच्या दोन वर्षांपासून नियमित कर्जाची परतफेड केलेली असावी.
३ ) इतर बँकेत खाते असणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात परंतु त्यांना इतर बँकेत असलेलं कर्ज खाते बंद करावे लागेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: agricultural land bank loan for land purchase land purchase scheme SBI Bank Sbi land purchasing scheme Scheme of farmers State bank of India एसबीआय बँक एसबीआय लँड परचेस स्कीम भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया