आता महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचे दिवस भरले आहेत. योगी सरकारने अशा वाईट नजरेच्या गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन दुराचारी’ सुरू केले आहे. ऑपरेशन दुराचारी अंतर्गत महिलांची छेड काढणे, लैंगिक गुन्हे किंवा बलात्काराच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांचे पोस्टर्स आता भर चौकात लावण्यात येणार आहेत. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा धडक निर्णय घेतल्याचे उत्तरप्रदेशच्या सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
काय आहे ऑपरेशन दुराचारी
१. महिलांविरुद्ध गुन्ह्याची घटना घडल्यास बीट प्रभारी, चौकी प्रभारी, ठाणे प्रभारी व सर्कल अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.
२. महिलांची छेड काढणाऱ्या लैंगिक गुन्हे किंवा बलात्काराच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांचे भरचौकात पोस्टर लावले जातील. यावर अपराध्यांची नावे आणि फोटो क्रॉसिंगवर चिकटवण्यात यावीत.
३. महिला पोलिसांकरवीच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
४. अँटी- रोमियो स्क्वॉडला अधिक सक्रिय व मजबूत करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.