Categories: गुन्हे

तिसंगी येथे विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यु!

गगनबावडा | तालुक्यातील तिसंगी येथे तरूणाला विजेचा शॉक लागून मृत्यु झालाय. सकाळी (१४ जुलै) साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली असून यामुळे तरूणाच्या कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलाय. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रसाद बाजीराव साळुंखे (वय १८, रा. निवडे) हा तरूण आज सकाळी तिसंगी (गगनबावडा) येथे खासगी शाळेच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करीत होता. घरगुती मोटारीच्या सहाय्याने बांधकामावर पाणी मारत असताना अचानक शॉक लागल्याने त्याला उपचारासाठी निवडे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह गगनबावडा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास गगनबावडा पोलिस करत आहेत.

प्रसाद अकरावी इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याचे आईवडील गेली चार वर्षे तिसंगी येथे मोलमजूरी करत होते. यावेळी आईवडीलांना मदत म्हणून प्रसाद तिसंगी येथील बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत होता. एकुलत्या एक मुलाच्या अकस्मात मृत्युने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Team Lokshahi News