मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत विविध स्वरूपाच्या १३ हजार ५२१ पदांची नोकरभरती चार वर्षांपासून रखडली आहे. या भरतीसाठी ग्रामीण विकास विभाग स्वमान्य प्रशासन विभागाकडे बोट दाखवून आपली  जबाबदारी झटकताना दिसते आहे. विशेष असे की, या भरतीच्या अनुषंगाने राज्यभरातील सुमारे १३ लाख सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब युवकांकडून परीक्षा शुल्क म्हणून गोळा केलेली २५कोटी ८७ लाख रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत पडून आहे.

३ मार्च २०१९ ला शासनाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात काढली होती. त्यात सर्वाधिक ७२९ पदे अहमदनगर जिल्ह्यात, तर सर्वात कमी १४२ पदे भंडारा जिल्हा परिषदेतील आहेत. या एकूण १३ हजार ५२१ पदांसाठी राज्यभरातून १२ लाख ७२ हजार ३९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. खुल्या प्रवर्गाच्या एका पदासाठी ५०० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी २५० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले गेले.

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे  

 • अहमदनगर – ७२९
 • अमरावती – ४६३
 • अकोला – २४२
 • औरंगाबाद – ३६२
 • भंडारा – १४२
 • बीड – ४५६
 • चंद्रपूर – ३२३
 • गोंदिया – २५७
 • गडचिरोली – ३३५
 • हिंगोली – १५०
 • नाशिक – ६८७
 • लातूर – २८६
 • नंदुरबार – ३३३
 • पालघर – ७०८
 • परभणी – २५९
 • रायगड – ५१०
 • सातारा – ७०८
 • नागपूर – ४१८
 • पुणे – ५९५
 • बुलडाणा – ३३२
 • वाशिम – १८२
 • यवतमाळ – ५०५
 • जालना – ३२८
 • उस्मानाबाद – ३२०
 • ठाणे – १९६
 • नांदेड – ५५७
 • रलागिरी – ४६६
 • सिंधुदुर्ग – १६२
 • धुळे – २१९
 • वर्धा – २६७
 • जळगाव – ६०७
 • कोल्हापूर – ५३२
 • सांगली – ४७१
 • सोलापूर – ४१४

रिक्त असलेल्या पदांचे नाव 
कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, कृषी व सांख्यिकी, स्थापत्य सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी