Categories: राजकीय

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

गेल्या पंधरा वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर भारिप म्हणजे आताच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता

चार ठिकाणी महाविकास आघाडीची बाजी, भाजपला धोबीपछाड

मुंबई। राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्मुला अस्तित्वात आल्यानंतर राजकारणाची सर्वच गणिते बदलत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्यामुळे राज्यातील सत्ता सोडावी लागलेल्या भाजपला आता राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषदांमधील सत्ता देखील गमवावी लागत आहेत. आज झालेल्या राज्यातील ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुक निकालात तब्बल पाच ठिकाणी भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आहे. 

नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे आज निकाल लागलेत. यामध्ये धुळे वगळता बाकी ठिकाणी भाजपला हार पत्करावी लागली आहे. या सहा जिल्हापरिषदांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपला सर्वाधिक धक्का हा नागपुरात बसला आहे. 

या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने नागपूर, वाशिम, पालघर, आणि नंदूरबार येथे सत्ता काबीज केलीय. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. तर भाजपला धुळे जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली आहे. 

अकोला जिल्हा परिषदेचा निकाल
अकोला एकूण जागा ५३ पैकी  ५०

 1. भाजप – ७
 2. शिवसेना -११
 3. काँग्रेस – ४
 4. राष्ट्रवादी – ३
 5. वंचित – २१
 6. इतर – ४

नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल
नागपूर एकूण जागा ५८ पैकी ५७

 1. भाजप – १४
 2. शिवसेना – १
 3. काँग्रेस – ३१
 4. राष्ट्रवादी – १० 
 5. इतर – २

वाशिम जिल्हा परिषदेचा निकाल
वाशिम एकूण जागा ५२ पैकी  ५२

 1. भाजप – ७
 2. शिवसेना – ७
 3. काँग्रेस – ९
 4. राष्ट्रवादी -१०
 5. इतर – १९

धुळे जिल्हा परिषदेचा निकाल
धुळे एकूण जागा ५६ पैकी  ५६

 1. भाजप – ३९
 2. शिवसेना – ४
 3. काँग्रेस – ७
 4. राष्ट्रवादी – ३ 
 5. इतर – ३

नंदूरबारजिल्हापरिषदेचानिकाल
नंदूरबार एकूण जागा ५६ पैकी  ५६

 1. भाजप – २३
 2. शिवसेना – ७
 3. काँग्रेस – २३
 4. राष्ट्रवादी – ३
 5. इतर – ०

पालघर जिल्हा परिषदेचा निकाल
पालघर एकूण जागा ५७ पैकी  ५७

 1. भाजप – १०
 2. शिवसेना – १८
 3. काँग्रेस – १
 4. राष्ट्रवादी – १५
 5. इतर – १३
Team Lokshahi News